IB मध्ये २४ पॉइंट्स पास होण्यासाठी पुरेसे आहेत, पण तुमच्या प्रत्येक विषयात किमान गुण मिळाले पाहिजेत, आणि 'टोकेन्स' पूर्ण केल्या पाहिजेत — हा नियम माझ्या मुलीसाठी IB शिकवणाऱ्या मॅडमनी सांगितला. आमच्या इथल्या मराठी शाळेत, एकूण टक्केवारी जास्त असेल तर पास, इतके सोपे होते. पण IB हे साखर कारखान्याच्या हिशोबासारखे आहे — प्रत्येक छोटीक बेरीज बरोबर असली पाहिजे, नाहीतर एकूण योगही फुकट जातो.
#education#university
Jump in to reply — no account needed.